About Us

कथा…जी प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाची असते. मग तो जीव सजीव असो वा निर्जीव. ती कथा असते त्याच्या उगमापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंतच्या त्याच्या जगण्याची. या दोन्ही उगम आणि शेवट अशा शब्दांमध्ये मग स्थिरावलेला असतो तो संपूर्ण आयुष्याचा लखाखता प्रवास. तो प्रवास असतो प्रत्येकाच्या जगण्याचा. तो प्रवास असतो आयुष्यात येणाऱ्या कठीण अडचणींना धीराने तोंड देत पुढे चालत राहिलेल्या क्षणांचा. तो प्रवास असतो यश – अपयशाचा! संघर्षमयीन जगण्याच्या याच प्रेरणादायी कथा तुम्हाला https://storiesindia.com/ या वेबसाईटच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या कथा असतील संघर्षाला आपल्या कुशीत घेऊन आयुष्याचा अथांग प्रवास अगदी हलक्या – फुलक्या पद्धतीने जगणाऱ्या लाखो भारतीय फिनिक्सांच्या ! 

तर मंडळी वरील परिच्छेदातून थोडक्यात ही वेबसाईट नेमकी कशावर असणार आहे, याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तर आजच्या आधुनिक काळातल्या या बदलणाऱ्या माध्यमाचा अवलंब करून आम्ही अशा असंख्य कथा येणाऱ्या काळात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही कथा असू शकेल आव्हांनाना धीराने तोंड देत आज स्वतःचा आशादायी भवताल निर्माण केलेल्या फिनिक्सांची, स्त्रियांच्या भावविश्वाची, डिजिटल जगताची, एका नवतरुण उद्योजकाची, आपल्या जगण्याची आडवाट स्वीकारून गरुडझेप घेणाऱ्या अग्नी पंखांची…तर ही कथा असेल तुमची – माझी – आपल्या सर्वांची. ज्यात प्रत्येकाला डोकावता येईल आपल्या स्वतःच्याच जगण्याचे भावविश्व. ती वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाच्या जगण्यात खुलेल किमान १ % तरी असा प्रेरणेचा आशादायी अवकाश…! तर बघुयात आम्हाला ते जमतंय का…तुम्ही सोबत असाल याची आशा बाळगतो ! 

तुम्हालाही जर तुमची कथा – तुमचा प्रवास हा प्रेरणादायी आहे असं वाटत असेल आणि त्या कथेच्या माध्यमातून किमान एका व्यक्तीच्या जगण्यात प्रेरणेची मशाल निर्माण होईल, अशी खात्री वाटत असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तुमची ती कथा storiesindia8@gmail.com या ईमेल आयडीवर तुमच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला पाठवू शकता. बाकी मग पुढे संपर्कात आपण राहूच ! तर चला…एकमेकांच्या सोबतीने, एकमेकांना आधार – पाठबळ देत एका नव्या आशादायी प्रवासाला सुरुवात करुयात !

– प्राजक्ता हरदास.